शेरास सव्वाशेर हा इयत्ता तिसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील एक पाठ आहे. या पाठांमध्ये नाना काका आपल्या शेताच्या संरक्षणासाठी एक युक्ती करतात. त्यांची ही युक्ती शेतातील हुशार उंदीर यशस्वी होऊ न देता आपली युक्ती वापरून त्यांची युक्ती हाणून पाडतात. याबाबतचे वर्णन या पाठामध्ये आलेले आहे. या ठिकाणी आपण शेरास सव्वाशेर स्वाध्याय प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये अभ्यासणार आहोत.
शेरास सव्वाशेर स्वाध्याय
प्र) १. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) नाना काका आनंदाने का डोलत होते?
उत्तर – वाऱ्या बरोबर डोलणारी आपली समोरची शेती पाहून नाना काका आनंदाने डोलत होते.
आ) सर्वच उंदीर पिंपापाशी का धावत आले?
उत्तर – तळलेल्या भज्यांच्या खमंग वासाने सर्वच उंदीर पिंपापाशी धावत आले.
इ) झाडाच्या आडोशाला कोण लपून बसले होते?
उत्तर – झाडाच्या आडोशाला नाना काका लपून बसले होते.
प्र. २. तर काय झाले असते?
अ) नाना काकांनी उंदीर पकडण्यासाठी पिंजरा ठेवला असता तर….
उंदीर पिंजऱ्यात अडकले असते अथवा उंदरांनी युक्ती करून खाऊ खाल्ला असता.
आ) नाना काकांच्या शेतात साप असते तर…
सापांनी उंदीर खाल्ले असते.
नाना काका सापाला घाबरले असते.
इ) नाना काकांच्या शेतात उंदीर नसते तर….
शेताची नासाडी झाली नसती.
ई) नाना काकांच्या शेतात मांजर असते तर….
मांजरांनी उंदीर खाल्ले असते व नाना काकांच्या शेताचे नुकसान थांबले असते.
प्र ३. खालील वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करा व लिहा.
अ) अधीर होणे.
शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके मिळणार असल्याने मी पुस्तकांसाठी अधीर झालो.
आ) फस्त करणे.
उंदरांनी खमंग भजी फस्त केली.
इ) सामसूम होणे.
अंधार पडताच सर्वत्र सामसूम होते.
ई) कूच करणे.
सैनिकांनी शत्रुसैनिकाच्या दिशेने कुच केली.
उ) कपाळावर हात मारणे.
उंदरांची युक्ती पाहून नाना काकांनी आपल्या कपाळावर हात मारला.
ऊ) युक्ती सफल होणे.
उंदीर पकडण्याचे नाना काकांची युक्ती सफल झाली.
प्र ४. खालील शब्दांच्या सुरुवातीला ‘अ’ लावून नवीन शब्द तयार करा.
अ) धीर – अधीर.
आ) शक्य – अशक्य.
इ) स्वस्थ – अस्वस्थ.
ई) प्रकाशित – अप्रकाशित.
प्र ५ .’ शेरास सव्वाशेर ‘ यासारख्या शब्दसमुहांना म्हणी म्हणतात. तुम्ही ऐकलेल्या, वाचलेल्या अशा म्हणी सांगा.
१) घरोघरी मातीच्या चुली.
२) पिंपळाला पाणी तीनच.
३) लेकी बोले सुने लागे.
४) नाचता येईना अंगण वाकडे.
५) उथळ पाण्याला खळखळाट फार.
६) अडला हरी गाढवाचे पाय धरी.
प्र ६. खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.
अ) नासाडी – साडी , नाडी.
आ ) कपाळावर – वर, पार, कर, कळा.
अशाप्रकारे शेरास सव्वाशेर स्वाध्याय प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये दिलेला आहे. याव्यतिरिक्त या पाठाशी संबंधित काही प्रश्न असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. ते प्रश्न या स्वाध्याय मध्ये समाविष्ट केले जातील.