आपल्या अवतीभवती हा इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यास पाठ्यपुस्तकातील पहिला घटक आहे. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना आपल्या सभोवतालीच्या परिसराचे निरीक्षण करण्याची सवय लागणे व आपल्या परिसरातील सजीव आणि निर्जीव घटकांची माहिती मिळवणे. या दृष्टीने या पाठातील माहिती महत्त्वाची आहे. या ठिकाणी आपण आपल्या अवतीभवती स्वाध्याय प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये अभ्यासणार आहोत.
आपल्या अवतीभवती स्वाध्याय
प्रश्न १) गाळलेले शब्द भरा.
१)कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा
बदलेल.
२)कापूस लोकर आणि रेशीम यापासून आपण
कापड विणतो.
३)झाडांची पाने गळतात, तीही पडून कुजतात .
प्रश्न २) चुक की बरोबर ते सांगा.
१)काही वनस्पतींच्या बिया वार्यामुळे विखुरल्या जातात. = बरोबर
२)वनस्पती निर्जीव आहेत. = चूक
३)किडे आणि धान्यांचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते. = बरोबर
प्रश्न ३) खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
१) माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात?
उत्तर- माणसाच्या बऱ्याच घरचा त्याच्या परिसरातून पूर्ण होतात. लाकूड, माती, दगड यांपासून तयार होणाऱ्या निरनिराळ्या वस्तू मानवाला परिसरातूनच मिळतात. कापसापासून कापड मिळते. त्याचे अन्नाची गरज परिसरातील शेतीतून पूर्ण होते. त्याला घर कामात लागणाऱ्या टोपल्या, प्राण्यांपासून मिळणारे घटक इत्यादी परिसरातून मिळतात.
२) वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते?
उत्तर- वनस्पतीना स्वतःचे अन्न तयार करण्यासाठी आवश्यक असलेला सूर्यप्रकाश, हवा, पाणी परिसरातून मिळते. त्याचबरोबर वनस्पतीची पाने गळून ती कुजतात, मेलेल्या प्राण्यांचे अवशेष मातीत मिसळल्याने जमीन कसदार होते .वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे किंवा प्राण्यांमुळे विखुरल्या जातात त्यामुळे इतर रोपे तयार होतात. अशाप्रकारे वनस्पतींना परिसरातून मदत मिळते.
३) जंगलातील माती कशामुळे कसदार होते?
उत्तर- वनस्पतींची पाने, मेलेल्या प्राण्यांचे अवशेष मातीत मिसळतात अशा सर्व वस्तू कुजून त्यामुळे जंगलातील माती कसदार होते .
प्रश्न ४) जरा डोके चालवा.
१) कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत?
उत्तर – १) कापसापासून धागा बनवून कापड बनवतात. २) दवाखान्यामध्ये व प्रथम उपचारासाठी जखमांवर वापरण्यासाठी कापूस उपयोगी पडतो. ३)घरामध्ये पणती लावण्यासाठी त्यामध्ये वात म्हणून ही कापसाचा उपयोग होतो. ४) तसेच गादी – उशी बनवताना त्यामध्ये कापसाचा वापर केला जातो.
२) चपला कशापासून बनवतात?
उत्तर- पूर्वी चपला प्रामुख्याने चामड्यापासून बनवल्या जात होत्या. आज चपला बनवण्यासाठी जांभळ बरोबरच रबर आणि प्लास्टिकचा वापर केला जातो.
३) चिमणी व दगडांच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी काय करेल? दगड काय करेल?
उत्तर – चिमणी आणि दगडाच्या जवळ आवाज झाला तर चिमणी भुर्रकन उडून जाईल. दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तरी त्याचा कोणताही परिणाम दगडावर होणार नाही .
४) पाल काय खाते?
उत्तर- पाय छोटे छोटे कीटक खाते .
५) तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी करा.
उत्तर- घरात लाकडी कपाट, खुर्ची, टेबल, खिडकी, दरवाजा, लाटणे – पोळपाट, बसायचा पाट, खेळणी, टी पॉय इत्यादी वस्तू आहेत .
६) कोणकोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात?
उत्तर- मांजर आणि साप हे प्राणी उंदीर खाऊन पोट भरतात .
प्रश्न ५) कोळी जाळे कशासाठी विणतो त्याची माहिती मिळवा . कोळ्याच्या जाळ्याचे चित्र काढा.
उत्तर- कोळी जाळे हे स्वतःला बसण्यासाठी त्याच बरोबर आपले भक्ष्य पकडण्यासाठी विणतो. छोटे कीटक, माशा कोळ्याच्या जाळ्यामध्ये आडकतात व त्या कोळ्याचे भक्ष बनतात.