Skip to content

Maharashtra NMMS question paper pdf for 8th

  • by
NMMS question paper pdf for 8th

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजेच (National Means cum Merit Scholarship Scheme Exam) NMMS question paper pdf मागील वर्षाचे प्रश्नपत्रिकांचा सराव करणे खूप आवश्यक असते. त्यामुळेच आपल्याला प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, सोडण्यासाठी लागणारा वेळ, प्रश्नांची काठिण्य पातळी इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळते.

NMMS परीक्षेसाठी पात्रता

  • इयत्ता आठवी मध्ये शिकणारे विद्यार्थी NMMS परीक्षा देऊ शकतात. सदर विद्यार्थी कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित शाळेत शिकणे आवश्यक आहे.
  • परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न तीन लाख पन्नास हजार पेक्षा कमी असावे. त्यासाठी पालकांच्या उत्पन्नाचा दाखला देणे अनिवार्य आहे.
  • सदर विद्यार्थ्याला सातवी मध्ये किमान 55 टक्के गुण मिळालेले असावेत. अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना किमान 50 टक्के गुण मिळालेले असावेत.
  • विनाअनुदानित शाळेत, केंद्रीय विद्यालयात, जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकत नाही.

NMMS परीक्षेचा सराव करताना जुन्या प्रश्नपत्रिका कशा डाऊनलोड कराव्या ही माहिती पाहणार आहोत.

NMMS Exam date 2024-25

सन 2024- 25 मध्ये होणारी राष्ट्रीय दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजेच NMMS परीक्षा 22 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे.

NMMS Exam 2024-25 online form last date

एन एम एम एस परीक्षेस बसण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात पाच ऑक्टोबर 2024 पासून झाली आहे. यासाठी आपण 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत विना विलंब शुल्क आपले आवेदन पत्र सादर करू शकता. त्यानंतर विलंब शुल्क भरून पण 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत आपले ऑनलाइन अर्ज सादर करू शकता.

शक्यतो आपले फॉर्म ४ नोव्हेंबर 2024 पूर्वी भरावेत.

Previous NMMS question paper pdf

मागील वर्षाचे NMMS question paper pdf प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.

  • NMMS च्या मागील वर्षाची प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या फोन आता लॅपटॉप मधील ब्राउझर ओपन करा.
  • ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये https://nmmsmsce.in/ टाईप करून सर्च करा.
  • सर्च केल्यानंतर राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा साईड ओपन होईल.
  • या पेजवर आपल्याला प्रश्नपत्रिका नावाची एक टॅब दिसेल. त्या त्याच्याखाली आपल्याला वर्ष निहाय प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्यासमोर माध्यम निहाय पर्याय दिसून येतील. ज्या माध्यमाच्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करावयाचे आहेत त्याच्या पुढील लिंक वर क्लिक करा.
  • त्यावरून आपण प्रश्नपत्रिका डाउनलोड करता येतील.

खालील लिंक वरून NMMS question paper pdf प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी लिंक समोरील click here वर क्लिक करतात.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा(National Means cum Merit Scholarship Scheme Exam) विषय-

१) बौद्धिक क्षमता चाचणी Mental Ability Test (MAT) : बौद्धिक क्षमता चाचणी ही एक मानसशास्त्रीय चाचणी आहे. यामध्ये कार्यकारण भाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पना वर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.

२) शालेय क्षमता चाचणी Scholastic Ability Test (SAT) : ही सामान्यता इयत्ता सातवी व आठवी च्या अभ्यासक्रमावर आधारित असते. यामध्ये सामान्य विज्ञान, समाजशास्त्र व गणित असे एकूण तीन विषय समाविष्ट आहेत. या तिन्ही विषयांचे प्रत्येकी 30 प्रमाणे 90 प्रश्न सोडवायचे असतात.

Click and Download Previous NMMS question paper in pdf

वर्षमाध्यमMATSAT
2017- 18मराठीClick HereClick Here
2018- 19मराठीClick HereClick Here
2019- 20मराठीClick HereClick Here
2020- 21मराठीClick HereClick Here
2021- 22मराठीClick HereClick Here
2022- 23मराठीClick HereClick Here
Previous NMMS question paper pdf

राज्यशासन स्वाध्याय इयत्ता 8वी

या ठिकाणी मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका दिलेले आहेत. याचबरोबर उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलगू व कन्नड इत्यादी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका आहे आपण वेबसाईटवरून डाऊनलोड करून घेऊ शकता. अथवा आपल्याला आवश्यक असल्यास कमेंट बॉक्समध्ये माध्यम लिहून कळवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *